Home क्राईम मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्या तरूणाला बदडले; संतप्त नागरीकांनी दुचाकी पेटविली

मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्या तरूणाला बदडले; संतप्त नागरीकांनी दुचाकी पेटविली


संतप्त जमावाने पेटविली दुचाकी पेटवून दिली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील कोल्हे हिल्स परिसरातील एका भागात राहणाऱ्या एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्नात आलेल्या तरूणाला परिसरातील नागरीकांनी पकडून बेदम मारहाण करत पोलीसांच्या ताब्यात दिल्याची घटना शुक्रवारी १४ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. एवढेच नाही तर संतप्त जमावाने तरूणाची दुचाकी पेटवून दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हे हिल्स परिसरातील एका भागात पत्र्याच्या घरात एक कुटुंबिय गेल्या १३ वर्षांपासून वास्तव्याला आहे. या ठिकाणी पती-पत्नी दोन मुले आणि दोन मुली वास्तव्याला आहे. शुक्रवार १४ जुलै रोजी सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचे आईवडील व दोन्ही भाऊ कामाच्या निमित्ताने बाहेर गेले होते. त्यावेळी सोळा वर्षीय मुलगी व तिची सहा वर्षाची लहान बहिण घरीच होत्या. दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास चंदुअण्णा नगरात राहणारा तरूण हा दुचाकी (एमएच १९ डीक्यू ७१७८) ने मुलीच्या घराजवळ आला.

पाणी पिण्याचा बहाणा करून सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पिडीत मुलीची सहा वर्षाची लहान बहिणीने आरडओरड केल्यानंतर परिसरातील नागरीकांनी धाव घेत संशयित तरूणाला रंगेहात पकडले. संतप्त नागरीकांनी तरूणाचा चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्यांची दुचाकी पेटवून दिली. हा प्रकार घडल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेत तरूणाला ताब्यात घेतले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.


Protected Content

Play sound