जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव तालुक्यातील रायपूर कुसुंबा येथे किराणा दुकानाजवळ बोलत उभ्या असलेल्या सचिन दिनेश यादव (वय २२, रा. रायपूर कुसुंबा, ता. जळगाव) याला जवळ बोलवून त्याच्याशी वाद घालत चॉपरने वार केला. ही घटना सोमवारी २२ जुलै रोजी रात्री ८ वाजता घडली होती. याप्रकरणी मंगळवारी २३ जुलै रोजी मध्यरात्री अडीच वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात रायपूर कुसुंबा येथील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, जळगावातील महाविद्यालयात शिक्षण घेणारा सचिन यादव हा रायपूर कुसुंबा येथे कुटुंबासह राहतो. त्याच्या गावातील एक जण त्याच्याकडे अधूनमधून दारुसाठी पैशाची मागणी करतो. मात्र पैसे न दिल्याने ‘तुला पाहून घेईल’, अशी धमकी देतो. सोमवारी २२ जुलै रोजी सचिनची आई घरी येत असताना दारूसाठी पैसे मागणाऱ्या तरुणाने शिवीगाळ केली. त्यानंतर सचिन यादव हा रात्री ८ वाजता एका किराणा दुकानाजवळ गावातीलच एका जणासोबत बोलत असताना सचिनच्या आईला शिवीगाळ करणाऱ्यासह एकजण सचिनजवळ आले. दोघांनी त्यांनी वाद घालत यातील एकाने सचिनवर चॉपरने वार केला. तो वार चुकवित असताना सचिनच्या हातांच्या बोटाला दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला. या प्रकरणी मंगळवारी २३ जुलै रोजी मध्यरात्री अडीच वाजता सचिन यादव याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.