भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणावर चॉपर हल्ला

चाळीसगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील हिरापूर रोडवरील नवीन नाक्याजवळ मित्राचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणावर चॉपरने हल्ला चढवून गंभीर दुखापत केल्याची घटना शुक्रवार १० मे रोजी रात्री १० वाजता घडली. याप्रकरणी शनिवारी ११ मे रोजी दुपारी १ वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गौरव भिमा गवळी वय २२ रा. हिरापूर रोड चाळीसगाव असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. शुक्रवारी १० मे रोजी रात्री १० वाजता शहरातील हिरापूर रोडवरील नवीन नाक्याजवळ गौरवचा मित्र दुर्गेश गावळी आणि गणेश कैलास गवळी यांच्या सोबत भांडण सुरू होते. त्यावेळी गौरव गावळी हा भांडण सोडविण्यासाठी गेला. या रागातून गणेश कैलास गवळी, विशाल संतोष गवळी, सुधीर हांडे व रूपेश गावळी सर्व रा.चाळीसगाव यांनी चॉपरने गौरव गावळी याच्यावर हल्ला चढविला. त्यांच्यावर चॉपरने वार करून दुखापत केली. जखमी झालेल्या गौरवला चाळीसगाव ग्रामीण पोलीसात दाखल करण्यात आले. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यानुसार शनिवारी ११ मे रोजी दुपारी १ वाजता गणेश कैलास गवळी, विशाल संतोष गवळी, सुधीर हांडे व रूपेश गावळी सर्व रा.चाळीसगाव या चार जणांविरोधात चाळीसगाव शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले हे करीत आहे.

Protected Content