चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी कडून काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राजू तडवी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र आता चोपड्यातून महाविकास आघाडीचा उमेदवार बदलला असून भाजप नेते प्रभाकर गोटू सोनवणे यांना चोपड्यातून उमेदवारी देण्यात आली. त्यांचा पक्षप्रवेश मातोश्रीवर झाला असून त्यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.
प्रभाकर गोटू सोनवणे हे भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य गिरीश महाजन यांचे निकटवर्ती आहे. तसेच ते मतदार संघात कोळी समाजाचा चेहरा म्हणून ओळखले जातात. त्यामुळे आता चोपड्याची निवडणूक रंगतदार होणार असून महायुतीचे उमेदवार चंद्रकांत सोनवणे यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे.