चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील सत्रासेन येथून गावठी कट्टा घेऊन आलेल्या तरूणाला पोलिसांनी गजाआड केले आहे.
विशेष पोलिस महानिरीक्षकांचे पथक व चोपडा ग्रामीण पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करून गावठी कट्टा घेऊन आलेल्या तरूणाला अटक केली आहे. मध्यप्रदेशमधून चोपड्याकडे गावठी कट्टा घेऊन येणार्या संशयिताला, सत्रासेन गावाजवळील तीन नाकाजवळ पोलिसांनी अटक केली. राजपालसिंग ज्योतसिंग बडोले (वय २०,रा. उमर्टी, ता.वरला, जि.बडवानी) असे संशयिताचे नाव आहे. सत्रासेन गावाकडून तो चोपड्याकडे येत असतांना पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
चोपडा तालुक्यातील मध्यप्रदेशच्या सिमेला लागू असणार्या परिसरात गावठी कट्टयाची मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असल्याचे दिसून येत असून पोलिसांनी अलीकडच्या काळात धडक कारवाई करून अनेकांना अटक केलेले आहे. यात आता ही नवीन कारवाई करण्यात आलेली आहे.