चोपडा साखर कारखाना राजकीय अनास्थेचा बळी : एस.बी. पाटील

chopda sakhar karkhana

 

चोपडा (प्रतिनिधी) मागील चार वर्षात जिल्ह्यातील चोपडा व फैजपूर या दोन कारखान्यांना जिल्हा बँक व राज्य सरकारकडून मदतीची अपेक्षा होती. परंतू राजकीय अनास्थेमुळे चोपड्याला मदत मिळण्यास नेहमी अडचण येते. दुसरीकडे मात्र, फैजपूर साखर कारखान्याचे राजकीय नेतृत्व प्रभावी असल्यामुळेच आज पुन्हा एकदा मधुकर साखर कारखान्याच्या ७ कोटींच्या कर्जास सरकारची थकहमी मिळाली आहे. त्यामुळे चोपडा साखर कारखाना राजकीय अनास्थेचा बळी ठरत असल्याचा आरोप शेतकरी कृती समिती सदस्य एस.बी. पाटील यांनी केला आहे.

 

एस.बी. पाटील यांनी म्हटले आहे की, चोपड्यापेक्षा फैजपूर साखर कारखान्याची आर्थिक परिस्थिती कठीण आहे. परंतू तेथील शरद महाजन व त्यांची टीम जेडीसीसी बँकेकडून असो की, राज्य सरकारकडून नेहमीच मदत मिळवण्यात यशस्वी होतात. अगदी आज पुन्हा एकदा त्यांच्या साखर कारखान्याच्या ७ कोटींच्या कर्जास राज्य सरकारची थकहमी मिळवली आहे. चोपडा तालुक्याने गेल्यावेळेस रक्षाताई खडसे यांना ७२,००० हजाराचे मताधिक्क दिले होते. तर यावेळेस देखील तब्बल ७७,००० हजारचे मताधिक्क्य दिले. परंतू अशाच पूरक स्थितीतही तालुक्याच्या प्रकल्पला मदत मिळवण्यात कारखान्याचे स्थानिक नेतृत्व अपूर्ण पडत असल्याचा आरोप एस.बी. पाटील यांनी केला आहे. फैजपूर साखर कारखान्याचे संपूर्ण संचालक मंडळ कांग्रेसचे आहे. तर चोपड्यात सर्वपक्षीय संचालक आहेत. मग तरी देखील मदत का मिळत नाही? अजूनही वेळ गेली नाही आमदार चंद्रकांत सोनवणे व खासदार रक्षताई यांना सोबत घेऊन गिरीष महाजन यांच्याकडे साकडे घातले. तर आपल्या कर्जाला देखील थकहमी मिळू शकेल. त्यामुळे दोन पाऊल मागे येऊन सर्वांनी प्रकल्प वाचवावा,अशी विनंती देखील श्री.पाटील यांनी केली आहे.

Add Comment

Protected Content