चोपडा प्रतिनिधी । शहरातील मुख्य रस्त्यांवर मोकाट गुरांचा हैदोस असून यामुळे व्यापार्यांसह सर्वसामान्य नागरिक त्रस्त झालेले आहेत. याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.
याबाबत वृत्त असे की, शहरातील मुख्य रस्त्यावर अनेक समस्या आहेत. त्यात मोकाट गुरांची समस्या गंभीर बनली आहे. ही गुरे रस्त्यातून हालता हलत नाहीत. त्यात इतर अवजड वाहन, बेशीस्त पार्किंग , लोटगाड्यांची स्पर्धा इतक्या अडचणीतून पायदळी चालणार्या व्यक्तीला मार्गक्रमण करणे अवघड असते. अश्यात मागून – पुढून येणारी मोटार सायकल, रिक्षा, व इतर वाहन यांना सांभाळून चालणे कठीण होत आहे. अलीकडेच गांधी चौकात जैन स्थानकातून काही जैन महिला धार्मिक विधी आपटून घराकडे येत होते त्यात बाजार पेठेतील आसकरण ताराचंद जैन या कपडा दुकानाचे संचालक निलेश बरडीया यांच्या आईंना एका गायीने शिंग मारून जखमी केले होते.
याबाबत नगरपालिकेच्या प्रशासाकीय अधिकार्याना फोन लावून व प्रत्यक्षात तक्रार करण्यात आली असली तरी आज पर्यंतही गुरांचा बंदोबस्त झालेला नाही. कोणत्याही तक्रार सांगितली असली तरी मात्र प्रशासकीय अधिकारीचा व कर्मचार्यांना समन्वय दिसून येत नसल्याने सामान्य जनतेला मात्र त्रास सहन करावे लागत आहे. नगरसेवकांनी लक्ष देऊन मोकाट गुरांवर कारवाई करण्यासाठी सांगावे तसेच लोटगाड्यानाही शिस्त लावावी शिवाजी चौकात लोटगाड्याचा कहरच असतो त्यांना शिस्त लावण्यासाठी समज दयावी अशीही मागणी होत आहे. सकाळी ९ ते संध्या ७ वाजे पर्यंत शहरात अवजड वाहनांची वाहतूक बंद करावी, काही दुकानदारांना आपल्या अंगणातील पार्किंग व्यवस्थेसाठी कर्मचारी नियुक्त करायला सांगावे. शनी मंदिर ,विठ्ठल मंदिर ,शिवाजी चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, अश्या ठिकाणी लोटगाड्याना आळा बसायला हवा अशी मागणी शहरवासी करत आहेत. यात मात्र पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासन यांची दोघांनी संयुक्त कारवाई करावी ही अपेक्षादेखील व्यक्त करण्यात येत आहे.