चोपडा प्रतिनिधी । येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील अकरावी विज्ञान वर्गाच्या विद्यार्थ्यांच्या पालकांची सभा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.ए. सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
याप्रसंगी व्यासपीठावर पालक प्रतिनिधी भिमराव महाजन, शोभाताई बडगुजर, अशोक माणिकराव साळुंखे, उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एल. चौधरी, डॉ.व्ही.टी.पाटील उपस्थित होते. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी म्हणाले की विद्यार्थी, शिक्षक ,पालक व संस्थाचालक यांच्यातील समन्वय व गुणवत्ता वाढीसाठी अभ्यासपूरक उपक्रम, विद्यार्थ्यांची ध्येयनिश्चिती, मेहनत व चिकाटी यामुळे दरवर्षी बोर्ड परीक्षा व प्रवेश परीक्षा निकाल उंचावत असून विद्यार्थी नामांकित मेडिकल व इंजिनियरींग, औषधनिर्माणशास्र व पदवी महाविद्यालयात प्रवेश मिळवून महाविद्यालयाचा व कुटूंबाचा नावलौकिक वाढवित आहेत. पालक भिमराव महाजन, अशोक साळुंखे व अश्फाक पठान यांनी महाविद्यालयात गुणवत्ता वाढीसाठी राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांबद्ल गौरवोद्गार काढले. प्रास्तविक उपप्राचार्य बी एस हळपे यांनी केले. द्वितीय सत्र नियोजन पर्यवेक्षक व्ही वाय पाटील यांनी सांगितले. सूत्रसंचालन दिपाली पाटील यांनी वआभार आर आर बडगुजर यांनी मानले. पालक व शिक्षकवृंद उपस्थित होते.