Home क्राईम चोपडा शहरातून एकाची मोटारसायकल लांबविली

चोपडा शहरातून एकाची मोटारसायकल लांबविली

two wheelar thift

चोपडा प्रतिनिधी । शहरातील कस्तूरबा शाळेसमोर पार्किंगला लावलेली १५ हजार रूपये किंमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीला आली. चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, अर्जून राजेंद्र भालेराव (वय-२६) रा. पंचशिल नगर रामपूरा चोपडा हे कामाच्या निमित्ताने २ सप्टेंबर रोजी शहरातील कस्तूरबा शाळेजवळ मोटारसायकल (एमएच १९ डीएच ५४४०) ने सायंकाळी ७.३० वाजता आले. काम आटोपून रात्री ८ वाजता मोटारसायकलजवळ घरी जाण्यासाठी आले असता त्यांना त्यांची मोटारसायकल दिसून आली नाही. परिसरात देखील शोधाशोध केली परंतू मिळाली नाही. अर्जून भालेराव यांनी चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र सोनवणे करीत आहे.

 


Protected Content

Play sound