चोपडा प्रतिनिधी । येथील राष्ट्रवादी शिक्षक संघटनेच्यावतीने पंचायत समितीच्या आवारात आज दि. 6 ऑगस्ट रोजी शिक्षण विभागात रूजू झालेले शिक्षणविस्तार अधिकारी सुमित्र अहिरे व विभाग प्रमुख डॉ. भावना भोसले यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे. त्याबरोबर त्यांचे संगोपन करणे, तेवढेच महत्त्वाचे आहे. प्रत्येक झाडाला प्रत्येक शिक्षक व कार्यालयातील कर्मचारी यांचे फलक लावून ते वाढविण्याची जबाबदारी त्यावर राहिल असे बी.एस.कोसोदे यांनी यावेळी सांगितले. वृक्षारोपण करतांना पंचायत समितीचे सदस्य सूर्यकांत खैरनार, गटविकास अधिकारी बी.एस. कोसोदे, सहाय्यक गटविकास अधिकारी एस.बी.कोळी, गटशिक्षणाधिकारी डॉ. भावना भोसले, शिक्षण विस्तार अधिकारी यांनी ही वृक्षारोपण केले आहे.
यावेळी एस.जी.गजरे, सुमित्र अहिरे, केंद्रप्रमुख अशोक साळुंखे, नरेंद्र सोनवणे, राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस सतीश बोरसे, उपाध्यक्ष पंकज बडगुजर, तालुकाध्यक्ष प्रदीप बोरसे, सुनील धनगर, आधार पान पाटील, सतीश पाटील, सुनील इंगळे, पुरुषोत्तम सोनवणे, लीलाधर कोळी, शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस योगेश सनेर हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी किशोर सोनवणे, दीपक पाटील, दीपक शिंपी, प्रशांत सोनवणे, मिलिंद पाटील, प्रांजली पाटील, ममता पाटील व विनोद बोढरे यांनी परिश्रम घेतले आहे.