चोपडा प्रतिनिधी । अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदतर्फे आज दि. 27 ऑगस्ट रोजी नायब तहसिलदार जितेंद्र पंजे यांना 10 समस्यांबाबत निवेदन देण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुशील कुमार पावरा शिक्षक खेड तालुका यांच्या बोर्डतर्फे आदेशाला स्थगिती देऊन मागे घेण्यात यावा, त्याच्या न्याय मागण्यांची पूर्तता करण्यात यावी, शासकीय आदिवासी वस्तीगृहमध्ये बिगर आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्याबाबत सुधारित मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे सुधारित करून हा शासन निर्णय रद्द करण्यात यावा, शासकीय आदिवासी मुला-मुलींचे वस्तीगृह जळगाव जिल्ह्यासह तालुकासह विविध पंडित दिनद्यायल संयम योजना बंद करून वसतिगृहाची संख्या वाढविण्यात यावी, शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह चोपडा येथे प्रवेश यादी त्वरित प्रसिद्ध करण्यात यावी, शासकीय आदिवासी मुला-मुलींचे वसतिगृह जळगाव जिल्हासह तालुका स्तरावर उर्वरित सर्व पात्र विद्यार्थी व विद्यार्थींनीची यादी त्वरित प्रसिद्ध करून त्वरित प्रवेश देण्यात यावे, पदव्युत्तर नंतर बीएड अभ्यासक्रमात दरवर्षीप्रमाणे वसतिगृहात प्रवेश देण्यात मात्र यावर्षी त्याचे प्रवेश अर्ज स्विकारत नसल्यामुळे ते स्विकारण्यात येवून प्रवेश देण्यात यावा, शैक्षणिक सहलीची निर्वाह भत्ता, डी.बी.टी रक्कम त्वरित देण्यात यावी आणि याचबरोबर, मुलींचे वसतिगृह चोपडा येथे रिक्त पदी गृहपाल, लिपिक, त्वरित भरण्यात यावे, सन-२०१८-१९ वर्षाची शैक्षणिक शिष्यवृत्ती त्वरित देण्यात यावे, संयम योजना बंद करण्यात यावी, यावल प्रकल्प कार्यालयात वसतिगृहाचा कामकाज पाहणाऱ्या कर्मचारी अनुभव कर्मचाऱ्यांना नियुक्ती करण्यात यावे, असे दहा विविध समस्यासंदर्भात तहसिलदार जितेंद्र पंजे यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदन देतांना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जळगाव जिल्हा अध्यक्ष दारासिंग पावरा, निलेश भालेराव जळगाव शहर अध्यक्ष जिल्हा सचिव संजय पाडवी, ग्रामीण चोपडा तालुका अध्यक्ष नामसिंग पावरा, उपसचिव आदेश पावरा, महेंद्र पावरा, पवन पावरा, रेहजल बारेला, चूनिलाल बारेला, कुटवाल बारेला, दिपक पावरा निमीलाल पावरा आदि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.