Home Cities चोपडा चोपडा येथील बरडीया परिवारात आदर्श लग्नसोहळा

चोपडा येथील बरडीया परिवारात आदर्श लग्नसोहळा

0
100
bardiya
bardiya

bardiya

चोपडा प्रतिनिधी । येथील बरडिया परिवारामध्ये नुकताच अनोखा लग्नसोहळा पार पाडला आहे.

याबाबत माहिती अशी की, व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष सुनील बरडीया यांचे पुतणे व व मेन रोडजवळील नवल प्रोव्हिजन्सचे संचालक अशोकचंद बरडीया यांचा सुपुत्र सूरज बरडीया (ह.मु.नाशिक) यांची लग्नाचा विचार सुरु असतांना त्यांना काही नातेवाईकांनी येवला येथील जीवनलाल शिंगी यांची मुलगी ऐश्वर्या शिंगी हिला पाहण्यासाठी गेले होते. तेव्हा मुलगी पसंद आल्यानंतर अवघ्या काही दिवसातच जैन पद्धतीने साधेपणाने लग्न लावण्याचे ठरवून, त्यानुसार दि.१५ जुलै रोजी येवला येथे अनेक रुढी परंपराना फाटा देत साधेपणाने मोजक्या लोकांमध्ये लग्न उरकून जैन समाजात एक आदर्श निर्माण केला आहे. जैन समाजात लग्न करणे म्हणजे मोठ्या जिकरीचे असते. मानपान, खानपानातील मानपान, अश्या विविध रूढींना फाटा देत अगदी साध्या पद्धतीने लग्न लावून घेतले. येवला, चोपडा, नाशिक येथील मंडळी आनंदी होत. यासाठी बरडीया परिवारातील शांतीलाल, सुरेशचंद, जगदीश, आदिंनी मेहनत घेतली आहे.


Protected Content

Play sound