Home Cities चाळीसगाव चाळीसगावात लग्नसराईची धूम; ट्राफिक जॅम आणि मंदिरे हाऊसफुल्ल !

चाळीसगावात लग्नसराईची धूम; ट्राफिक जॅम आणि मंदिरे हाऊसफुल्ल !


chalisgaon1 1

चाळीसगाव (प्रतिनिधी) आज दिनांक 26 एप्रिल ही तारीख लग्न मुहूर्तासाठी सगळ्यात मोठी तिथी असल्यामुळे चाळीसगावात लग्नसराईची धूम सुरु आहे. शहरात मोठ्या प्रमाणात आज लग्न असल्यामुळे शहरात अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत झालीय. तर एकाच पारावर तीन-तीन नवरदेव असल्यामुळे मंदिरे देखील हाऊस फुल्ल झाल्याचे चित्र होते.

 

आज सकाळपासूनच शहरातील सर्व रस्ते लग्नाच्या मिरवणुकीने गजबजून गेलेले आहेत. डीजे, बँड आणि पारंपरिक वाद्यांवर रणरणत्या उन्हात थिरकणारी वऱ्हाडी मंडळी शहरातील प्रत्येक रस्त्यावर पाहावयास मिळत आहे. अनेक पारावर एकापेक्षा अधिक नवरदेवांची देखील गर्दी झाली आहे. त्यामुळे एकाच मंदिराच्या बाहेर तीन ते चार घोडे वरराजाच्या प्रतीक्षेत उभे असल्याचे चित्र होते. एकप्रकारे मंदिरे देखील आज नवरदेव आणि वऱ्हाडी मंडळींच्या गर्दीने हाऊसफुल्ल झाले होते. यामुळे शहरातील रस्ते देखील वाहतुक विस्कळीत झालीय. तर प्रत्येक जण आपण जात असलेल्या लग्नसमारंभात हजेरी लावण्यासाठी लगीन घाई करत असल्याचे दिसून येत आहे.

 

chalisgaon2


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound