पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील श्रीमती कसळाबाई शंकर पवार प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा, वरसाडे तांडा येथील विद्यालयातील कलाशिक्षक परशुराम पवार यांनी श्री चित्रगणेशाची स्थापना केली आहे.
तसेच, ग्राम विकास मंडळाचे संचालक मिलिंद देव व क्षमा देव यांच्या हस्ते स्थापना करण्यात आली आहे. यावेळी दोन्ही विभागातील मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थितीत होते. पर्यावरण रक्षणासाठी, प्रदूषण रोखण्याची अत्यावश्यक गरज आहे. त्यासाठी प्लॅस्टिक, थर्माकोलपासून होणारे प्रदूषण टाळले पाहिजे. त्याच बरोबर सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवासाठी बाजारात आलेल्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तीमुळेही प्रदूषणात दरवर्षी वाढ होत असते. कापडावर किंवा फळ्यावर चित्र साकारल्या मुळे कोणतेही नुकसान होत नाही. शंभर टक्के प्रदूषणमुक्त गणरायाची निर्मिती करून आपल्या शाळेत व आपल्या घरी स्थापना केली आहे. त्यामुळे एक वेगळा आदर्श त्यांनी भाविकांपुढे दाखविलेला आहे. आपणही घरी फलकावर, कागदावर किंवा कापडावर असेच चित्रण करून जर श्री गणेशाची किंवा नवरात्री स्थापना केली तर पर्यावरण सांभाळण्यासाठी प्रत्येकाची मदत होईल. असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. विसर्जन करतांना चित्र फळ्यावर असेल तर फळा विधिपूर्वक ओल्या कापडाने पुसून ते पाणी आपण तुळशी वृंदावन ला टाकू शकतो जर कापडावर असेल तर ते फ्रेम करून आपण घरात ठेवू शकतो किंवा भेट देऊ शकतो.