जळगाव प्रतिनिधी – शहरातील चित्रा चौकात असलेले मनीष प्लाझा मधील किराणा दुकान फोडून चोरट्यांनी दीड लाखांची रोकड लंपास केल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला आहे. या घटनेबाबत शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोरा येथील सिंधी कॉलनीत राहणारे रमेशलाल मदनानी यांचे चित्रा चौकातील मनीष प्लाझामध्ये कमल जनरल स्टोर्स नावाने दुकान आहे. 14 मार्च रोजी गुरुवारी दिवसभर व्यवसाय केल्यानंतर रात्री ८ वाजता त्यांनी रोख रक्कम १ लाख ५० हजार रुपये ड्रॉवरमध्ये ठेवून दुकान बंद केले होते. आज पहाटे साडे पाच वाजेच्या सुमारास मदनानी यांना दुकानाजवळ राहणारे भोसले यांनी फोन करून दुकानाचे कुलूप तोडले असून शटर तोडण्याचा प्रकार केला असल्याची माहिती सांगितली. मदनानी यांचे नातेवाईक जळगावात राहत असल्याने त्यांना याची माहिती दिल्यानंतर त्यांना दुकानावर पाहणी करण्यासाठी सांगितले. तर पाहणी केल्यावर चोरी झाल्याचे लक्षात आले. सकाळी ८.३० वाजता मदनानी यांनी जळगावात येऊन खात्री केली असता दीड लाख रुपये रोख लंपास केल्याचे लक्षात आले. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जनरल स्टोअर्सचे दुकान फोडून दीड लाखांचा मुद्देमाल लंपास
6 years ago
No Comments