Home क्राईम चिंचोली येथे आग ; सुदैवाने जीवितहानी नाही (व्हिडिओ )

चिंचोली येथे आग ; सुदैवाने जीवितहानी नाही (व्हिडिओ )

0
49

WhatsApp Image 2019 04 28 at 7.19.09 PM

धानोरा (प्रतिनिधी) यावल तालुक्यातील चिचोली येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी आग लागल्याची घटना घडली. आग गावकऱ्यांनी व अग्निशमन दलाने लवकर आटोक्यात आणल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

 

चिंचोली येथे अकलेश्वर- ब-हानपुर रोडावरील  हॉटेल व्यंकटेशजवळ उसाच्या शेताच्या बांधाला दुपारी २ वाजेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. यात शेतातील उस जाळला आहे.  ही आग चिंचोली येथील नागरिकांनी विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, आग आटोक्यात येत नसल्याने यावल येथून अग्निशमन दलास प्राचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवली. यात शेतातील उस जाळला आहे.  ही आग विझवण्यासाठी किरण साठे,  विजय पाटील, सुनिल देशमुख, सुभाष दिहेदे, अशोक बेहेडे, प्रशांत साठे, पोलिस पाटील राकेश साठे यांनी मदत केली. या आगीत हॉटेलचेही थोड्या प्रमाणात नुकसान झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, दुसऱ्या घटनेत उंटावद रोडावरील डिपीने अचानक पेट घेतली होती. ही आग देखील आटोक्यात आणण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound