सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील चिनावल येथील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी श्रीकांत सरोदे यांचे आज आकस्मीक निधन झाल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, चिनावल येथील श्रीकांत सिताराम सरोदे ( वय ५५ ) यांचे आज अकस्मात निधन झाले. ते भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी तसेच सामाजिक क्षेत्रातील अग्रगण्य व्यक्तीमत्व म्हणून ख्यात होते. ते चिनावल येथील शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरावर शोककळा पसरली आहे. ते माजी जि.प. सदस्या तनुजा सरोदे यांचे पती तर मोहित सरोदे यांचे वडील होत.
दरम्यान, श्रीकांत सरोदे यांच्या पार्थिवावर अतिशय शोकाकुल वातावरणात रात्री उशीरा अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी समाजाच्या सर्व स्तरांमधील मान्यवरांपासून ते सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.