Home राष्ट्रीय चीन व्हेटो वापरून सुटू शकणार नाही ; चर्चेत द्यावी लागणार कारणे  

चीन व्हेटो वापरून सुटू शकणार नाही ; चर्चेत द्यावी लागणार कारणे  


 

images 3

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याचे प्रयत्न अजूनही संपलेले नाहीत. चीनने व्हेटोचा वापर करत हा प्रस्ताव फेटाळून लावल्यानंतर चीनच्या या भूमिकेचा भारताने निषेध केला आहे. दुसरीकडे अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन अजूनही याप्रकरणी चीनसोबत चर्चा करत आहेत.

या चर्चेनंतरही चीनने आपली भूमिका बदलली नाही तर हे तीन्ही देश संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत या मुद्द्यावर खुली चर्चा ठेवण्याच्या प्रस्तावावरदेखील विचार करत आहेत. भारताच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या समितीत मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याबाबत अजूनही काम करत आहे.
मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्र संघात फेटाळण्यात आला. फ्रान्सने हा प्रस्ताव संघात ठेवला होता.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound