Home क्राईम विजेचा शॉक लागल्याने चिमुकल्याचा दुदैवी मृत्यू; नातेवाइकांचा आक्रोश

विजेचा शॉक लागल्याने चिमुकल्याचा दुदैवी मृत्यू; नातेवाइकांचा आक्रोश


भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील दिनदयाल नगरात राहणाऱ्या एका ९ वर्षीय बालकाचा ईलेक्ट्रीक शॉक लागल्याने दुदैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी ३ डिसेंबर रोजी घडली आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुर्गेश दिपक ठाकूर वय ९ रा. दिनदयाल नगर, भुसावळ असे मयत झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे.

याबाबत अधिक असे की, भुसावळ शहरातील दिनदयाल नगरात दुर्गेश ठाकूर हा मुलगा कुटुंबियांसह राहत होता. दरम्यान बुधवारी ३ डिसेंबर रोजी सकाळी राहत्या घरात त्याला इलेक्ट्रीक शॉक लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने भुसावळ येथील ट्रामा केअर सेंटर येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केल्यानंतर मयत घोषीत केले. यावेळी नातेवाईकांनी रूग्णालयात एकच आक्रोश केला होता. याबाबत भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण इंगळे हे करीत आहे


Protected Content

Play sound