अमळनेरात माजी आमदार चिमणराव पाटील यांचा सत्कार

chimanrao patil

अमळनेर (प्रतिनिधी)। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तापी पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्षपदी शिवसेनेचे माजी आमदार चिमणराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल अमळनेर येथे जाहीर सत्कार करण्यात आला.

 

याप्रसंगी अमळनेर नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पुष्पलता पाटील, माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील, नगरपालिकेचे बांधकाम सभापती मनोज पाटील, नगरसेवक निशांत अग्रवाल व शफीदादा उपस्थित होते. माजी आमदार चिमणराव पाटील यांनी सत्कार प्रसंगी असे सांगितले की तापी पाटबंधारे महामंडळाच्या माध्यमातून चांगले काम करण्याचा मानस आहे. पदाचा उपयोग लोकांच्या अडचणी व समस्या सोडवण्यासाठी करेल असे सांगितले.

Add Comment

Protected Content