धाबे येथे पंतग बनविण्याच्या कार्यशाळेला मुलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

dhabe

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील धाबे येथे जि.प. प्राथमिक शाळेत कार्यानुभव विषयांर्तगत मकर संक्रात सणाचे औचित्य साधून मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे व वरिष्ठ शिक्षक गुणवंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पतंगकार मयुर शिंपी यांची स्व:हस्ते पतंग बनविण्याची व सुरक्षितपणे उडविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यास मुलांनी उर्त्स्फुत प्रतिसाद दिला आहे.

मकर संक्रांतीला तीळगुळ वाटण्याबरोबरच पतंग उडविण्याचीही परंपरा असून आदिवासी मुलांनामध्येही ती कला रुजविण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्लास्टिक पेपर बंदीच्या धर्तीवर कागदाचे रंगीत ताव, बांबुच्या पट्टी, खळ, चाकु, सुती दोरा यांचा वापर करून विदयार्थ्यांनी कलात्मक पतंग बनविल्या. त्यांना स्व: निर्मितीचा आनंद मिळाला.

शाळेचे वरिष्ठ शिक्षक गुणवंतराव पाटील यांनी मकर संक्रांत हा सण हिवाळ्यात येत असून आपल्या शरिरात उष्णता कमी होते. ती टिकुन ठेवण्यासाठी व वाढविण्यासाठी तीळगुळ खाण्याचे महत्व आहे. तसेच तीळगुळ एकमेकांना आदान-प्रदान करुन कुटुता समाप्त करून गोडवा वाढविण्याचे ध्येय आहे. शाळेचे मुख्याध्यापक यांनी प्रशिक्षक मयुर शिंपी यांचे आभार मानून मकर संक्रांतीच्या काळात हवा स्थिर असते. पतंग आकाशात उडण्यासाठी मदत होते. हे अवकाश खुप मोठे आहे. येथे प्रत्येकाला आपली पतंग उडविण्याचा अधिकार व जागा आहे. जीवनात कोणाचीही पतंग कापु नये. ज्याला त्याला आपल्या इच्छेने जीवनाची पतंग उडवु दयावी, समोरच्याची पतंग कापतांना आपल्याही पतंगाचा दोरा म्हणजे जीवनसुत्र घासले जाते.

मित्रत्वाचे व खेळीमेळीचे वातावरण जोपासणारी ही परंपरा जिवंत ठेवावी. उंच जागेवर, जेथे विद्युत वाहक तारा असतील, विहीर, तलाव, पाणवठे, नदी, समुद्र, वर्दळीचा रस्ता, रेल्वे मार्ग असेल तेथे पतंग उडवु नये. सुरक्षितता व सावधानता बाळगावी. धारदार चायना किंवा असा मांजा न वापरता सुती दोऱ्याचा वापर करून त्यात पक्षी अडकणार नाहीत व जखमी होणार नाहीत याची काळजी घ्यावी. अशा सूचना विद्यार्थ्यांना यावेळी देण्यात आल्या.

Protected Content