Home Cities जामनेर पहूर येथे चिमुकल्यांनी केली पथनाट्याद्वारे मतदार जागृती

पहूर येथे चिमुकल्यांनी केली पथनाट्याद्वारे मतदार जागृती


44fc61ef 390f 4d6a 81da de2e9a84c6ff

पहूर, ता.जामनेर (वार्ताहर) येथील महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित डॉ. हेडगेवार प्राथमिक विदयालय व सावित्रीबाई फुले माध्यमिक विदयालयाच्या चिमुकल्यांनी आज (दि.२२) पथनाट्याद्वारे मतदार जनजागृती केली.

 

डॉ.कॅप्टन एम.आर. लेले बसस्थानक परिसरात सादर केलेल्या ‘जागर मतदानाचा’ या पथनाटयात अनिकेत काळे, वृषाली काळे, गणेश देशमुख, दिनेश पाटील, मोनिका घोंगडे, खुशी घोंगडे, ममता घोंगडे व धनश्री घोंगडे या विदयार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यांना शिक्षक शंकर भामेरे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी शिक्षण संस्थेचे सचिव भगवान घोंगडे, मुख्याध्यापक अजय देशमुख, प्रा.प्रकाश लहासे, अॅड. देवेंद्र पारळकर, रामेश्वर पाटील, शांताराम लाठे यांच्यासह ग्रामस्थ व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चिमुकल्यांच्या या राष्ट्रीय कार्यातील सहभागाबद्दल उपस्थितांनी रोख बक्षीस देऊन त्यांचे कौतूक केले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound