Home क्राईम बालक खून प्रकरण : नाभिक समाजाचे यावल प्रशासनाला निवेदन !

बालक खून प्रकरण : नाभिक समाजाचे यावल प्रशासनाला निवेदन !

0
213


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल शहरात पाच वर्षांच्या बालकाची निर्घृण हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ शहरातील श्री जीवा महाले नाभिक बहुउद्देशीय संस्था, तसेच हिंदू-मुस्लिम खलिफा न्हावी आणि सलून व्यावसायिक एकत्र आले. त्यांनी यावल तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्यात निवेदन देऊन, या अमानुष कृत्याचा निषेध केला. या घटनेतील दोषी आरोपी शेख शाहिद शेख बिस्मिल्ला याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी या निवेदनातून केली आहे.

आरोपीला कठोर शिक्षा द्यावी, समाजाची मागणी
पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे आणि तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांना निवेदन दिले. आरोपीने केलेले कृत्य अमानवीय असून, त्याचे कोणीही समर्थन करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या घटनेतील आरोपीवर जलदगती न्यायालयात खटला चालवून त्याला कठोर शिक्षा, म्हणजेच फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. निवेदन देताना अनिल चौधरी, सईद रऊफ न्हावी, सुपडू वारूळकर, समसोद्दीन मोईनोद्दीन, अमोल आमोदकर, शहाबुद्दीन मोईनोद्दीन यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

मयत बालकाच्या कुटुंबाचे सांत्वन
या दुर्दैवी घटनेनंतर शहरातील मुस्लिम खलिफा न्हावी बांधवांनी निषेध म्हणून आपले व्यवसाय बंद ठेवले होते. या घटनेच्या वेदना सर्व समाजाला जाणवल्या. समाजातील हिंदू-मुस्लिम नाभिक बांधव एकत्र आले आणि त्यांनी मयत बालकाच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. त्यांनी पीडित कुटुंबाप्रती सहानुभूती व्यक्त केली आणि या दुःखात आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असा विश्वास दिला. समाजाच्या या एकजुटीमुळे सामाजिक सलोख्याचे एक चांगले उदाहरण समोर आले आहे.


Protected Content

Play sound