जळगाव प्रतिनिधी । लग्नाचे आमिष दाखवत गेल्या चार वर्षांपासून तरूणीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीला आली आहे. या अत्याचारातून पिडीत तरूणीने एका मुलाला जन्म दिल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रामानंद नगर पोलीसांनी नराधमाला अटक केली असून त्याच्याविरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, शहरातील एका भागात १९ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियांसह राहते. त्यांच्या परिसरात राहणारा तरूण अजय राजू भालेराव या तरूणाची १९ वर्षीय तरूणीशी ओळख २०१७ मध्ये झाली. नंतर तिच्याशी जवळीक साधत लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार करण्यास सुरूवात केली. वास्तविक अजय भालेराव याचे आगोदर लग्न झालेले आहे. हा अत्याचार जुलै २०२१ पर्यंत सुरू राहिला. यात तरूणी गर्भवती राहून मुलाला जन्म दिला. लग्नासाठी विनवणी करूनही अजय भालेराव याने लग्नास नकार दिला. या प्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरुन काल बुधवारी ४ ऑगस्ट रोजी रात्री ७ वाजता भालेराव याच्या विरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून संशयित आरोपी भालेराव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश शिंदे तपास करीत आहेत.