पंढरपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. याप्रसंगी त्यांनी राज्यातील जनतेला सुखी-समाधानी ठेवण्याचे साकडे घातले.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणार्या श्रीविठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांची मांदियाळी दिसून येत आहे. कालपासूनच राज्यच नव्हे तर देशाच्या कान्याकोपर्यातून लाखो आबालवृध्द भाविक पंढरपुरात दाखल झाले. पहाटे अडीच वाजेपासून श्री विठ्ठल-रखुमाई यांचे पूजन सुरू झाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सौभाग्यवतींसह मुख्य शासकीय पूजा केली. याप्रसंगी ना. गिरीश महाजन, ना. चंद्रकांत पाटील, ना. दीपक केसरकर आदींसह राजकीय व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
दरम्यान, गेल्या सोळा वर्षांपासून नियमीतपणे पंढरीची वारी करणार्या सटाणा तालुक्यातल्या अंबासन येथीर रहिवासी शेतकरी बाळू शंकर अहिरे (वय ५५ वर्षे) आणि त्यांची पत्नी आशाबाई बाळू अहिरे (वय ५० वर्षे) यांना पुजेचा मान मिळाला. तर, लागोपाठ तिसर्यांना पंढरपुरात पुजा करण्याचे भाग्य आपल्याला लाभल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आनंद व्यक्त केला. राज्यातील जनता सुखी होऊ दे. राज्यातील प्रत्येक घटक यांच्या जीवनात आनंदाचे दिवस विठ्ठलाने आणावे असं मागणं देखील मागितल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातील बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, त्याचं पिक चांगलं येऊ दे, चांगला पाऊस येऊ दे शेतकर्यांच्या जीवनात सोन्याचे दिवस येऊ दे असे साकडे आपण श्री विठ्ठलाला घातल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी दिली.