मुंबई (वृत्तसंस्था) जेव्हा मंत्री राजीनामा देतो तेव्हा तो मुख्यमंत्र्यांकडे जातो किंवा राजभवनात जातो. अब्दुल सत्तारांनी राजीनामा दिला की नाही याबाबतचे सत्य मुख्यमंत्री किंवा राजभवन सांगू शकते, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत दिली आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी खातेवाटपापूर्वीच राज्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन ठाकरे सरकारला पहिला धक्का दिला आहे.
संजय राऊत पुढे म्हणाले की, शिवसेनेने अब्दुल सत्तारांना राज्यमंत्री देऊन त्यांचा सन्मान केला. शिवसेनेच्या कोट्यात जास्त विभाग नाही. सर्वांना अॅडजस्ट करावे लागते. मुख्यमंत्र्यांनी सन्मान ठेवत अब्दुल सत्तारांना मंत्रिपद दिलं आहे, असे संजय राऊत म्हणाले. मी सुद्धा सत्तारांच्या राजीनाम्याची बातमी पाहिली. ते नाराज का आहेत ते मला माहित नाही. त्यांना मंत्री बनवले आहे. पण त्यांना कॅबिनेट मंत्रिपद हवे आहे. शिवसेनेच्या कोट्यात जास्त विभाग नाहीत. सर्वांना अॅडजस्ट करावे लागते. मुख्यमंत्र्यांनी सन्मान ठेवत त्यांना मंत्रिपद दिले आहे, असे राऊत यांनी नमूद केले. सत्तार यांनी हातावर शिवबंधन बांधले आहे. मरेपर्यंत शिवबंधन सोडणार नाही, असा शब्द अब्दुल सत्तार यांनी दिला होता. ते शब्द पाळणारे नेते आहेत, असं संजय राऊत म्हणाले.