भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत शिक्षण विभाग अंतर्गत प्रशिक्षणार्थीच्या वतीने पाचोरा-भडगावचे आमदार किशोर आप्पा पाटील यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. निवेदनात खालील मागण्या केल्या आहेत.


सहा महिने प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना शैक्षणिक पात्रतेनुसार त्या पदावर दिलेले प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थी शैक्षणिक पात्रतेनुसार आमचा कालावधी वाढून मिळावा. कालावधी वाढवून मिळाल्यानंतर आम्हाला त्याचे ठिकाणी नोकरी देऊन आमचे मानधन वाढवून मिळावे, ज्या प्रशिक्षणार्थी यांनी सहा महिने सेवा दिली. त्यांना शासकीय भरती प्रक्रिया मध्ये १०% जागा राखीव ठेवण्यात याव्यात, आम्ही एवढे शिक्षण घेतले असून आम्हाला त्या शिक्षणाचा काही उपयोग व्हायला हवा त्यामुळे आपण आम्हाला आपण कालावधी वाढवून द्यावा, तसेच आमचे थकीत मानधन लवकर मिळावे, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी म्हणून आम्ही प्रत्येक शाळेत अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहोत व पुढे ही करत राहु , तसेच आमचा कार्यकाळ जर वाढवला नाही तर आम्हावर उपासमारीची व बेरोजगाराची वेळ येईल आम्ही शिक्षण केलेले वाया जाईल म्हणून आमच्या सर्व मागण्या मंजूर करुन आम्हाला न्याय मिळाला ही उपेक्षा आहे अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.
यावेळी धनराज पाटील(पिचर्डे),सोनम पाटील, धनंजय पवार,गणेश पाटील वैशाली माळी, माधुरी देसले,पुजा कुमावत,अश्विनी वसईकर,श्रुती पाटील,ऐश्वर्या चव्हाण,मोहिनी जाधव, प्रिया पाटील, दिनकर भिल, विशाल पाटील, विकास सावंत, मोहिनी महाजन,वैशाली पवार,अमोल पाटील,सतिश गांगुर्डे रुचिका पाटील,इंदिरा पाटील, पुजा महाजन,शितल भाभरे अभिजित जाधव व रविंद्र भराडी हे युवा प्रशिक्षणार्थी शिक्षक व शिक्षिका यांच्या सह्या चे निवेदन देण्यात आले


