Home राजकीय सलग पाचव्यांदाओडिशाचे मुख्यमंत्रीपदी म्हणून नवीन पटनायक यांचा शपथविधी

सलग पाचव्यांदाओडिशाचे मुख्यमंत्रीपदी म्हणून नवीन पटनायक यांचा शपथविधी

naveen patnaik
naveen patnaik

naveen patnaik
 

ओडिशा (वृत्तसंस्था) सलग पाचव्यांदा ओडिशाचे मुख्यमंत्री म्हणून नवीन पटनायक यांनी शपथ घेतली आहे. यावेळी पटनायक यांच्यासह एकूण 21 मंत्र्यांनी शपथ घेतली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटकरुन नवीन पटनायक यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

भुवनेश्वरमधील एक्झिबिशन ग्राऊंडमध्ये नवीन पटनायक यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नवीन पटनायक यांच्यासह मंत्रीमंडळात एकूण 21 मंत्र्यांचा समावेश आहे. यामध्ये 11 कॅबिनेट मंत्री आणि 9 राज्यमंत्री आहेत. यात 10 नवीन चेहरे आहेत. 146 सदस्य असलेल्या ओडिशा विधानसभेच्या निवडणुकांत बिजदने 112 जागा तर राज्यातील 21 पैकी 12 लोकसभा जागांवर या पक्षाने विजय मिळविला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound