जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून ते शेंदुर्णी आणि जामनेर येथील कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन दुपारी 3:45 वाजता जळगाव विमानतळावर होणार असून त्यानंतर ते शेंदुर्णी, ता. जामनेर येथे जातील. तिथे दुपारी 4:30 वाजता “दि शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप. सोसायटी लि.” संस्थेच्या अमृत ग्रंथ प्रकाशन व शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.
यानंतर फडणवीस यांचे जामनेर येथे आगमन होणार असून श्री. गोविंद महाराज क्रीडांगण, हिवरखेडा रोड, जामनेर येथील “नमो कुस्ती महाकुंभ – 2” या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. उदघाटन कार्यक्रमानंतर संध्याकाळी 7.15 वाजता जामनेर वरून जळगाव विमानतळाकडे प्रयाण , 7.45 वाजता जळगाव विमानतळ येथे आगमन , रात्री 7:50 वाजता जळगाव विमानतळावरून मुंबईकडे प्रयाण असा त्यांचा दौरा प्रशासनाला प्राप्त झाला आहे.