Home Cities जळगाव खराब हवामानामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री जळगाव विमानतळावर उतरले

खराब हवामानामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री जळगाव विमानतळावर उतरले


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | धुळे येथील कार्यक्रमानिमित्त आज मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री पवार हे धुळे दौर्‍यावर असून खराब हवामानामुळे त्यांना जळगाव विमानतळावर उतरावे लागले आहे.

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत आज धुळे येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या अंतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याच्या अंतर्गत लाभार्थ्यांना थेट लाभाचे वाटप करण्यात येणार आहे. हा प्रशासकीय कार्यक्रम असून याच्या यशस्वीतेसाठी प्रशासनाने मोठी तयारी केलेली आहे.

 

या दौर्‍यासाठी आज दुपारी दोनच्या सुमारास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री धुळे येथे येणार होते. तथापि, खराब हवामानामुळे त्यांचे विमान हे जळगाव विमानतळावर उतारण्यात आले असून येथून ते रस्त्याने प्रवास करून धुळे येथे जाणार आहेत.

 

दरम्यान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आकस्मीकतणे जळगाव विमानतळावर उतरावे लागल्याने प्रशासनाची एकद धांदल उडाली. तथापि, तात्काळ ताफ्याची व्यवस्था करून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे धुळ्याकडे रवाना झाले.


Protected Content

Play sound