नवीदिल्ली, वृत्तसंस्था | आयएनएक्स मीडिया प्रकरणात आज दुपारी माजी गृहमंत्री पी.चिदंबरम यांना सी.बी.आय. कोर्टाने २६ ऑगस्टपर्यंत सी.बी.आय.कोठडी दिली आहे. याबाबत सुनावणी नुकतीच पूर्ण झाली होती व निर्णय अर्धा तास राखीव ठेवण्यात आला होता.
दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयानंतर सर्वोच्च न्यायालयानेही दणका दिल्यानंतर माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना बुधवारी रात्री अटक करण्यात आली होती. त्यांना आज (दि.२२) सी.बी.आय.ने दुपारी सी.बी.आय. न्यायालयात हजर करण्यात आले होते. तिथे दोन्ही कडच्या वकिलांनी आपापली बाजू मांडली आहे. दोन्हीकडील तर्क ऐकून न्यायमूर्तीनी हा निर्णय दिला आहे.