Home Cities यावल जोरदार शक्तीप्रदर्शन करत यावल शहरात छायाताई पाटील यांची प्रचार रॅली !

जोरदार शक्तीप्रदर्शन करत यावल शहरात छायाताई पाटील यांची प्रचार रॅली !

0
131

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येत्या २ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. यावल नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाकरिता महाविकास आघाडीचा घटक असलेल्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने छायाताई पाटील निवडणूक लढवत असून, त्यांच्या प्रचाराला नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे.

या निवडणुकीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, यावलचे अत्यंत अभ्यासू व अल्पावधीत शहराच्या विकासाला नवी दिशा देणारे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्या खंबीर नेतृत्वाखाली हा प्रचार केला जात आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नियोजनबद्ध प्रचारामुळे निवडणुकीत चांगला वेग आला आहे.

पाटील दाम्पत्य (सौ. छायाताई पाटील आणि अतुल पाटील) आणि त्यांच्या पॅनलच्या सर्व सहकाऱ्यांनी होम टू होम (घरोघरी जाऊन) प्रचाराची तिसरी फेरी अंतिम टप्प्यात पूर्ण केली आहे. या प्रचारादरम्यान त्यांनी गेल्या १४ महिन्यांच्या अल्प कालावधीत अतुल पाटील यांनी नगराध्यक्ष म्हणून केलेली लक्षवेधी विकास कामे हाच प्रचाराचा मुख्य मुद्दा बनवला आहे.

पाटील यांनी केलेल्या ठोस विकास कामांमुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मक भावना असून, त्यांच्या नेतृत्वाला पसंती मिळत आहे. याच कारणामुळे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. छायाताई पाटील यांना सर्व स्तरांवरून मोठ्या प्रमाणात जनसमर्थन मिळताना दिसत आहे. विकासावर आधारित या प्रचारामुळे महाविकास आघाडीचे पॅनल निवडणुकीत मजबूत स्थितीत पोहोचले असून, २ डिसेंबर रोजी यावलवासीय विकासालाच मत देतील, असा विश्वास पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.


Protected Content

Play sound