सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बुधवारी १९ फेब्रुवारी रोजी, छत्रपती संभाजी महाराज व्यापारी संकुल सावदा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी विशाल भाऊ तायडे, वेडू लोखंडे, अन्नू मेघाणी, हरी संजय भाऊ तायडे, रशीद तडवी, तलाठी सावदा, निरजभाऊ सोनवणे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शुभम भाऊ ठोसरे, झबा भाऊ निकम, भूषण पुरभी, दिनेश आहुजा, टारझन तायडे, गणेश तायडे, युवराज लोखंडे, शुभम सुतार, नितीन अमरनानी, अरुण होले, साबीर मन्यार, मनोज लोखंडे, ऋषी बारी आणि छत्रपती संभाजी कॉम्प्लेक्समधील पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
या जयंती सोहळ्यात व्यापारी संकुलातील सर्व व्यापारी, नागरिक, युवक आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाथेचा जागर, त्यांचे कार्य आणि विचार नवीन पिढीपर्यंत पोहोचावे यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.