यावल प्रतिनिधी । अखिल भारतीय लेवा विकास महासंघाच्या यावल तालुकाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते चेतन करांडे यांची नुकतीच निवड करण्यात आली.
अखिल भारतीय लेवा विकास महासंघाचे संस्थापक केंद्रीय अध्यक्ष विष्णु भंगाळे यांच्या शिफारसी वरून संघाच्या विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सागर सतिश सरोदे यांनी संघटनेचे प्रसार प्रचार करून प्रबळ उभारणी करावी व समाज एक संघ करावा, लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विचार प्रणालीवर मार्गक्रमण करून समाजाच्या समस्या सोडण्यासाठी अखिल भारतीय लेवा विकास महासंघाच्या विद्यार्थी संघटनेच्या यावल तालुकाध्यक्ष चेतन कमलाकर करांडे यांची निवड केली आहे.
चेतन कमलाकर करांडे यांची संघटनेच्या यावल तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राजु करांडे, चेतन पाटील, अजय बढे, रोहन महाजन, रामदास करांडे, सुशाल पाटील, प्रजय सोनवणे, गौरव पाटील, आकाश जाधव, किरण पाटील, हर्षल करांडे, गोलु चौधरी, दिवाकर फेगडे, माजी नगरसेवक उमेश फेगडे, रितेश पाटील, लोकेश तानसर, अथर्व पाटील, वैभव पाटील यांच्यासह समाज बांधवांतर्फे सुभेच्छा देण्यात आले.