डाळीच्या ट्रकची परस्पर विल्हेवाट लाऊन व्यापाऱ्याची फसवणूक: एकाला अटक

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | डाळीने भरलेला ट्रक हा इच्छित स्थळी न पोहोचविता त्याचा रस्त्यातच कुठेतरी विल्हेवाट लावून अफरातफर केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी ट्रकच्या चालकाला मध्यप्रदेशातून अटक केली आहे. त्याला ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याने भिवंडीत ट्रकची विल्हेवाट लावल्याचे सांगितले आहे. त्याच्यावर यापूर्वी खुनाचा गुन्हादेखील दाखल आहे.

तिलक रविंद्र काबरा (वय ३१ वर्षे, रा. चैत्रबन कॉलनी, महाबळ परिसर, जळगाव) यांची जळगाव एम.आय.डी.सी. परिसरात असलेल्या सेक्टर नं. एस ३८/३९ मध्ये राधाकृष्ण अॅग्रो इंड्रस्ट्रिज प्रायव्हेट लिमीटेड या दालमिल कंपनी आहे. पनवेल जि रायगड येथे २७ लाख २९ हजार ६७८ रुपये किमतीच्या त्यांच्या कंपनीच्या दाळी या अनिल प्रल्हाद खेडकर (रा. पनवेल ता जि रायगड) यांच्या मालकीच्या ट्रेलर क्रमांक डी.डी ०१ एम ९४६५ मध्ये चालक राजासिंग उर्फ राजा अग्निदेवसिंग चौहान (रा. मरसराहा, सीधी, मध्यप्रदेश) हा घेवुन गेला होता. त्यांने सदरचा माल हा पनवेल येथे पोहचविला नव्हता. सदर मालाची त्याने परस्पर कुठतरी अफरातफर करुन विल्हेवाट लावली होती. म्हणून सदर बाबतीत तिलक काबरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरचा गुन्हा घडल्यानंतर चालक राजासिंग चौहान हा पसार झाला होता. त्याचा शोध सुरु होता. या दरम्यांन तो सिधी, मध्यप्रदेश येथे असल्यांबाबतची माहिती पोलीस निरिक्षक बबन आव्हाड यांना मिळाली होती. त्याप्रमाणे एमआयडीसी पोस्टेचे पोउनि/दत्तात्रय पोटे, सफौ / अतुल वंजारी, पोहेकाँ/किरण पाटील, विशाल कोळी, राहुल रगडे, साईनाथ मुंढे अशांनी जाउन सलग ३ दिवस माहिती काढली. संशयित आरोपी राजासिंग उर्फ राजा अग्निदेवसिंग चौहान यास त्याचे गावी मरसराह, सिधी मध्यप्रदेश येथुन जंगलातुन स्थानिक पोलीसांच्या मदतीने ताब्यात घेतले होते.

त्याला गुन्हयाकामी अटक करण्यात आली आहे. त्यास न्यायमुर्ती वसीम देशमुख यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ०६ दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे. सरकार तर्फे अॅड. स्वाती निकम यांनी कामकाज पाहिले. सदर मालाची त्याने भिवंडी शहरात विल्हेवाट लावल्याची कबुली दिली आहे. सदर राजासिंग चौहान याच्यावर याआधी एक खुनाचा गुन्हा दाखल आहे. त्याच्या ईतर साथीदारांचा शोध सुरु आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक महेश्वर रेडडी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक बबन आव्हाड, पोउनि/दत्तात्रय पोटे, सफौ अतुल वंजारी, पोहेकों/किरण पाटील, विशाल कोळी, राहुल रगडे, साईनाथ मुंढे अशांनी केली आहे.

Protected Content