Home क्राईम लग्नाचे आमिष दाखवून तरूणाची फसवणूक

लग्नाचे आमिष दाखवून तरूणाची फसवणूक


यावल प्रतिनिधी । तालुक्यातील चिंचोली येथील तरूणाला लग्नाचे आमिष दाखवल एक लाख रूपयांमध्ये चार जणांनी फसवणूक केली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील चिंचोली येथील राहणारा उमेश प्रल्हाद पाटील (वय-३७) या तरूणाला संशयित आरोपी रविंद्र बाळु कुऱ्हाडे, सोनाली रविंद्र कुऱ्हाडे, शुभांगी तुकाराम नागरे, सीमा प्रकाश जाधव यांच्यासह इतर चार ते पाच जणांनी गेल्या दोन महिन्यांपासून उमेश यांच्या संपर्कात राहून लग्नाचे आमीष दाखविले. यात वेळोवेळी पैश्यांची मागणी केली. दरम्यान आत्तापर्यंत तरूणाने १ लाख रूपये दिले. नंतर लग्‍न करण्यास नकार दिला व पळून जाण्याचा प्रयत्न केला. आपली फसवणूक होत आहे लक्षात आल्यानंतर यावल पोलीसात धाव घेतली. यावल पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक अरूण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि सुनिता कोळपकर, पोहेकॉ संजय तायडे करीत आहे.


Protected Content

Play sound