जळगाव प्रतिनिधी । सांगली व कोल्हापूर येथे झालेल्या महापूराने तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. तेथील पूरग्रस्तांना मदतीचा ओघ चालूच आहे. मोटेल कोझी कॉटेज, जळगाव व रामलालजी चौबे मेमोरियल ट्रस्टच्या वतीने उद्या गुरूवारी मदत गोळा केली जाणार पेट्रोल, डिझेल संघटनेचे अध्यक्ष प्रकाश चौबे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
गुरुवारी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी संपूर्ण पेट्रोल पंप सजविण्यात येणार असून सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत मोटेल कोझी कॉटेज, सागर पार्क समोर, जळगाव येथील पेट्रोलपंपावरून ग्राहकांनी भरलेल्या पेट्रोलच्या प्रत्येक एक लीटर मागे १ रूपया तसेच ऑइलच्या एक लीटर पॅक मागे ५० पैसे अशी रक्कम ही पूरग्रस्तांना पाठविण्यात येणार आहे. तसेच रामलालजी चौबे मेमोरियल ट्रस्ट यांच्या वतीने जमलेल्या रकमे एवढीच रक्कम ही पूरग्रस्तांना देण्यात येईल. जमलेली सर्व रक्कम महाराष्ट्र चीफ मिनिस्टर रिलीफ फंड मध्ये जमा करण्यात येणार आहे. जिल्ह्यात असा उपक्रम राबिविणारा हा कदाचित पहिलाच पेट्रोल पंप असणार आहे. त्यासाठी या निमित्ताने पम्पाच्या परिसरात उपलब्ध दान पेटित हि आपण स्वइच्छेने दान करू शकतो. या उपक्रमात जास्तीत जास्त नागरीकांना सहभाग नोंदवून पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्याचे आवाहन चौबे मेमोरियल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी पत्रकार परिषदेस सागर चौबे उपस्थित होते.