जामनेर (प्रतिनिधी)। शहरात युवराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त उद्या 14 मे वार मंगळवार रोजी दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील महान राजास अभिवादन करणेसाठी सभेचे आयोजन सकाळी 10 वाजता शहरातील राजमाता जिजाऊ चौक, नगर परिषद प्रशासकीय इमारत समोर करण्यात आले आहे.
या अभिवादन सभेस प्रचंड संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, बामसेफ यासह सर्वच परिवर्तनवादी संघटने कडून करण्यात आले आहे.