जळगाव प्रतिनिधी | नागवेल प्रतिष्ठान, जळगाव खान्देश आयोजित ९ वा राज्यस्तरीय बारी समाजाचा वधु-वर परिचय मेळावा रविवार दिनांक ३ नोव्हेंबर रोजी बालगंधर्व खुले नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला होता. परंतु पावसाच्या अनिश्चिततेमुळे सदर कार्यक्रमाच्या स्थळात बदल करण्यात आलेला आहे.
नागवेल प्रतिष्ठानतर्फे राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा रविवार ३ नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता लेवा भवन आंबेडकर मार्केट जवळ बीएसएनएल ऑफिस च्या मागे येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व समाज बांधवांनी याची नोंद घ्यावी व मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन नागवेल प्रतिष्ठानतर्फे प्रा. नितीन बारी, भरत बारी, लतीश बारी, नितीन बारी, विनोद बारी, योगेश बारी, सुशील बारी, विजय बारी, भूषण बारीकमलेश बारी यांनी केले आहे.