पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पारोळा तालुक्यातील वंजारी खुर्द या गावाचे नाव बदलवा आणि त्या ठिकाणी महाराणा प्रताप नगर नवीन नाव द्या या मागणीसाठी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना राष्ट्रीय संघटक कोर कमिटी सदस्य बाळासाहेब पाटील यांनी गेल्या चार वर्षापासून मागणी केली आहे. ती मागणी त्याच्या २६ जानेवारीपर्यंत पूर्ण न झाल्यास तहसील कार्यालयासमोर आपण आत्मदहन करू असे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय येथे तहसीलदार गुंजाळ यांच्याकडे, पारोळा तहसील येथे नायब तहसीलदार शांताराम पाटील, पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक अमरसिंग वसावे, तर आमदार अनिल पाटील, यांचे कार्यालय सचिन पाटील यांनी ही निवेदने स्वीकारली आहेत.
याबाबत सविस्तर अशी की २६ जून २०२१, रोजी गावाचे नाव बदल करावे म्हणून दिलेला प्रस्ताव हा शासन दरबारी अडकून पडला आहे. संबंधित विभागाने मागितलेले सर्व कागदपत्रे पूर्ण केली आहेत. हे प्रकरण सचिवालयापर्यंत पोहोचले आहे. परंतु अद्याप पर्यंत त्याचा निर्णय लागत नाही. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी जातीवाचक व लांचनास्पद असतील अशी गावाची नावे बदलावी, असे शासनाचे धोरण असून देखील वंजारी हे नाव बदलून मिळत नाही. या गावात पूर्ण राजपूत समाजाची वस्ती आहे यात एकही वंजारी, बंजारा नागरिक नाहीत. तरीदेखील या गावाचे नाव शासन बदलायला तयार नाही. म्हणून निर्वाणीचा इशारा देत बाळासाहेब पाटील यांनी आत्मदहनाचा निर्णय घेतला आहे. तरी शासनाने याबाबत त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.