जळगाव प्रतिनिधी । खान्देश युननियन एज्युकेशन सोसायटी संचलीत कै.गि.न.चांदसरकर प्राथमिक विद्यामंदिरात शाळेत “नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
या शाळेत नवीन वर्षानिमित्त शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी शाळेत एक मोठ्या २०२० ची कलाकृती सादर केली.या कलाकृतीतून शाळेने व आजुबाजुच्या परीसरातील लोकांनी त्या संकल्पनेची स्तुती केली.हा विद्यर्थ्यांचा एकजुटीचा व सामुहीक कलाकृतीचा उपक्रम झाला. आणि त्याच बरोबर नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.या कलाकृतीला शाळेतील शिक्षक श्री.स्वप्निल भोकरे , महेश तायडे, अमोल सोनकुळ सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व कलाकृती घडवून आणली.
शाळेतील संस्थेचे अध्यक्ष मेजर नानासाहेब तसेच प्रमोद चांदसरकर, सुप्रीया चांदसरकर, सिमाताई चांदसरकर, मुख्याध्यापक श्याम ठाकरे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे भरभरुन कौतुक केले. या कार्यक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अर्चना बावीस्कर, शारदा चौधरी, अनिता वाघमारे, पुनम पाटील, जयश्री खडके, जयश्री पाटील, सिमा देवरे, स्नेहल नाईक, भूषण अमृतकर या सर्वांनी परिश्रम घेतले.