Home टेक्नोलॉजी चांद्रयान-३ ला इंटरनॅशनल स्पेस फेडरेशनतर्फे जागतिक अंतराळ पुरस्कार

चांद्रयान-३ ला इंटरनॅशनल स्पेस फेडरेशनतर्फे जागतिक अंतराळ पुरस्कार


मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने अंतराळ क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. चांद्रयान-३ हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे उतरवून भारत असे करणारा पहिला देश ठरला आहे. या मोहिमेमुळे देशाची मान जगात उंचावली आहे. इस्रोच्या या कार्याची दखल संपूर्ण जगाने घेतली आहे. चांद्रयान-3 ला इंटरनॅशनल स्पेस फेडरेशनने जागतिक अंतराळ पुरस्काराने सन्मानित केले आहे. या पूर्वी भारताशिवाय अमेरिका, रशिया आणि चीनने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्यास यशस्वी ठरले आहेत.

१४ ऑक्टोबर रोजी इटलीतील मिलान येथे ७५ व्या आंतरराष्ट्रीय अंतराळवीर परिषदेच्या उद्घाटन समारंभात हा पुरस्कार सोहळा होणार आहे. २३ ऑगस्ट २०२३ रोजी चांद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केले होते. तब्बल वर्षभरानंतर इस्रोच्या या कामगिरीचे जागतिक स्थरावर कौतुक केले जाणार आहे.

महासंघाने गुरुवारी सांगितले की, “इस्रोची चांद्रयान ३ मोहीम वैज्ञानिक जिज्ञासा आणि कमी खर्चात मोठ्या मोहिमा कशा आयोजित करव्यात याचे उत्तम उदाहरण आहे. ही मोहीम भारताच्या अंतराळ संशोधना मोठी चालना देणारी ठरली आहे. या सोबतच नावीन्यपूर्ण, संरचना आणि भूविज्ञानाच्या पूर्वी न पाहिलेल्या पैलूंचं दर्शन देखील या मोहिमेतून जगाला झाले आहे. चांद्रयान ३ च्या अनेक यशांपैकी एक म्हणजे भारताच्या अंतराळ आणि आण्विक क्षेत्रांचा यशस्वी समन्वय. यामध्ये मिशनचे प्रोपल्शन मॉड्युल अणु तंत्रज्ञानाने चालवले होते. चांद्रयान-३ लँडिंगच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

भारतीय आंतराळ संशोधन संस्था इस्रोने गेल्या महिन्यात जगाला हेवा वाटेल अशी कामगिरी केली. इस्रोने १४ जुलै २०२३ रोजी श्रीहरीकोटा येथून लाँच केलेलं चांद्रयान ३ हे अवकाशयान २३ ऑगस्ट २०२३ रोजी यशस्वीरित्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवलं. याद्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातला पहिलाच देश ठरला. त्यानंतर तब्बल १४ दिवस चांद्रयान ३ हे चंद्रावर संशोधन केले. प्रज्ञान रोव्हर व विक्रम लँडर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला चंद्रावरील वेगवेगळी माहिती, फोटो आणि व्हिडीओ पाठवले


Protected Content

Play sound