जळगाव प्रतिनिधी । पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठामार्फत डिसेंबर २०२० मध्ये सेट परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत जळगाव येथील अनुभूती इंटरनॅशनल स्कुलचे ग्रंथपाल चंद्रशेखर बाळकृष्ण वाघ यांनी “ग्रंथालय व माहितीशास्त्र” या विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण करीत यश संपादन केले.
चंद्रशेखर वाघ यांच्या यशाबद्दल अनुभूती इंटरनॅशनल स्कुलच्या संचालिका सौ. निशा जैन, प्राचार्य जे.पी. राव तसेच शिक्षक व शिक्षकेतर सहकारी यांनी अभिनंदन केले. सेट परीक्षेसाठी वाघ यांना मु.जे. महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. व्ही.एस. कंची, डॉ. चंद्रशेखर वाणी, प्रा. पंकज देशमुख, प्रा. हितेश ब्रिजवासी व गांधी रिसर्च फाऊंडेशन चे ग्रंथपाल अशोक चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.