जळगाव प्रतिनिधी । जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांच्या आज (दि.11) सकाळी 9 वाजता म्हसावद आणि बोरनार येथे प्रचार दौरा आयोजित करण्यात आला होता.
म्हसावद व बोरनार गावातील महिलाकडून चंद्रशेखर अत्तरदे व माधुरी अत्तरदे यांचे फुलहार घालून स्वागत करण्यात आले. या दौ-याप्रसंगी म्हसावद-विटनेर गटातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे दिसून आले असून नागरिकांनी प्रचार दौऱ्याला भरघोस प्रतिसाद दिला. यावेळी म्हसावद व बोरनार गावचे सरपंच, ग्रा.पं.सदस्य, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पन्ना प्रमुख तसेच पदाधिकारी, महेंद्र चव्हाण, प्रदीप पाटील, किरण साळुंखे, कुणाल वाणी, अमोल पाटील, दिनेश चव्हाण, अरुण कोळी, मनोज चौधरी, सुदर्शन बडगुजर व राकेश नन्नवरे (सरपंच, बांभोरी तथा तालुका सरचिटणीस, भाजपा युवा मोर्चा), निर्दोष पाटील (सरपंच, सोनवद) यांच्यासह असंख्य भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.