रावेरातील चंद्रकांत महाजन याचे एमएचटी-सीईटी परीक्षेत घवघवीत यश

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर शहरातील महात्मा फुले चौकातील युवक चंद्रकांत ज्ञानेश्वर महाजन याने एमएचटी-सीईटी या परीक्षेमध्ये 99.06 पर्सेंटाइल मिळवीत घवघवीत यश संपादन केले आहे.त्याच्या या यशा बद्दल परिवारा तर्फे आनंद व्यक्त करण्यात आला.

रावेर शहरातील महात्मा फुले चौकातील रहिवासी असलेला चंद्रकांत ज्ञानेश्वर महाजन यानेएमएचटी-सीईटीची तयारी घरीच ऑनलाईन क्लासेस लावून केली होती. मे महिन्यात एमएचटी-सीईटीची महाराष्ट्र शासनाने परीक्षा घेतली. या परीक्षाचा निकाल काल घोषित करण्यात आला यामध्ये चंद्रकांत महाजन याने 99.06 पर्सेंटाइल मिळून यश घवघवीत यश संपादन केले याबद्दल त्याचा मित्र परिवारातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी बबलूशेट नगरीया, संजय पाटील, भागवत चौधरी, डी डी वाणी, देवलाल पाटील, जयंत भागवत,प्रदीप वैद्य, सुनिल चौधरी, पिंटू महाजन, शालिक महाजन, प्रकाश पवार, सुरेश पाटील, दत्तु महाजन, संतोष श्रीखंडे,गोपाल महाजन आदींनी त्याचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

Protected Content