आव्हाणे शिवारातून अल्पवयीन मुलीला पळविले; तालुका पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील आव्हाणे शिवारातून अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील आव्हाणे शिवारात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या आईवडीलांसह राहते. अल्पवयीन मुलीचे वडील रिक्षा चालवून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. शनिवार ५ जून रोजी अल्पवयीन मुलगी शेजारच्यांचे कपडे देवून येते असे सांगून दुपारी १ वाजता घराबाहेर पडली. रात्री उशीरापर्यंत घरी न आल्याने आईवडीलांना शेजारी जावून पाहणी केली असता मुलगी घरी आली नसल्याचे सांगितले. त्यांनी मुलीच्या मित्र व मैत्रिणींकडे तपास केला परंतू मुलगी मिळाली नाही. अखेर रविवारी ६ जून रोजी रात्री उशीरा तालुका पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची तक्रार दिली. मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विलास पाटील करीत आहे.

 

Protected Content