जळगाव प्रतिनिधी । शहरातील आव्हाणे शिवारात सत्यम रेसीडन्सी येथे कारने शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत कारच्या मागच्या सीटचे कव्हर जळल्याची घटना १६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी काल मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास तालुका पोलीस ठाण्यात अकस्मीक आगीची नोंद करण्यात आली आहे.
सविस्तर माहिती अशी की, शेलेज शशिधरण नायर (वय-३८) रा. जेलरोड नाशिक हे मित्रांसह आव्हाणे शिवारातील सत्यम रेसीडन्सी येथील मित्र किरण भालेराव यांच्याकडे कार (क्रमांक एमएच १५ एचएम ५२६०)ने १६ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास आले. दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या कारमधून धुर निघायला लागला. ही बाबत रेसीडन्सीमधील काही महिलांच्या लक्षात आले. त्यांनी ततडीने पाणी घेवून आग विझविली. थोडक्यात हा प्रकार लक्षात आल्यामुळे कारचे होणारे नुकसान टळले आहे. या आगीत कारच्या मागच्या डाव्या साईडचा दरवाजा रूफ आणि वायरिंग जळल्या. याप्रकरणी काल मंगळवारी १७ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शेलेज नायर यांच्या खबरीवरून आकस्मिक आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल फेगडे करीत आहे.