वरळीमधून आदित्य ठाकरेंविरोधात शिंदे गटाकडून तगड्या उमेदवारांचे आव्हान !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | वरळी विधानसभा मतदारसंघातून शिवेसना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. यावेळी त्यांना वरळी विधानसभेतून कडवे आव्हान मिळणार आहे. २०१९ साली त्यांनी जेव्हा पहिल्यांदा निवडणूक लढविली होती, तेव्हा मनसेने त्यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता. शिवसेना-भाजपाची युती असल्यामुळे आदित्य ठाकरेंसाठी पहिली निवडणूक तुलनेने सोपी गेली होती. मात्र यावेळी मनसेकडून संदीप देशपांडे आणि आता शिवसेना गटाकडून मिलिंद देवरा यांचे तगडे आव्हान आदित्य ठाकरेंच्या विरोधात उभे ठाकले आहे.

मिलिंद देवरा यांनी एक्सवर पोस्ट करून उमेदवारीबाबत माहिती दिली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी जानेवारी महिन्यात मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा हात सोडून शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले होते. मिलिंद देवरा यांनी २००४ आणि २००९ साली दक्षिण मुंबई लोकसभेतून काँग्रेसच्या तिकीटावर विजय मिळविला होता; तर २०१४ आणि २०१९ साली त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना केंद्रातही मंत्रिपद देण्यात आले होते. वरळी विधानसभा हा दक्षिण मुंबई लोकसभेअंतर्गतच येतो. त्यामुळे या मतदारसंघात देवरा यांना माननारा एक वर्ग आहे. तसेच अमराठी मतांवर त्यांची पकड आहे. सध्या ते राजसभेचे खासदार आहे.

Protected Content