चल्ला श्रीनिवासुलु सेट्टी बनले एसबीआयचे अध्यक्ष

दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | चल्ला श्रीनिवासुलु सेट्टी हे स्टेट बँक ऑफ इंडियाचे अर्थात एसबीआयचे नवे अध्यक्ष बनले आहेत. एसबीआयने बुधवारी 28 ऑगस्ट रोजी आपल्या नियामक फाइलिंगमध्ये ही माहिती दिली. दिनेश खारा यांच्या जागी श्रीनिवासुलू सेट्टी यांना बँकेचे नवे अध्यक्ष बनवण्यात आले आहे. दिनेश खारा मंगळवारी 63 वर्षांचे झाल्यानंतर निवृत्त झाले. एसबीआयच्या अध्यक्षपदासाठी ६३ वर्षे ही उच्च वयोमर्यादा आहे.

चेअरमन होण्यापूर्वी सेट्टी हे बँकेचे सर्वात ज्येष्ठ व्यवस्थापकीय संचालक होते. सेट्टी यांना एसबीआयमध्ये ३६ वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय बँकिंग, ग्लोबल मार्केट्स आणि तंत्रज्ञान विभाग पाहिले. दोन महिन्यांपूर्वी, वित्तीय सेवा संस्था ब्युरोने एसबीआयचे पुढील अध्यक्ष म्हणून चल्ला श्रीनिवासुलू सेट्टी यांच्या नावाची शिफारस केली होती. केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या एफएसआयबीने म्हटले होते की, विद्यमान पॅरामीटर्स आणि त्यांचा एकूण अनुभव लक्षात घेऊन, ब्यूरो एसबीआयचे अध्यक्षपदासाठी चल्ला श्रीनिवासुलु सेट्टी यांची शिफारस करतो. सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय संस्थांमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची जबाबदारी एफएसआयबीकडे आहे.

Protected Content