चाळीसगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तथा राष्ट्रीय महिला मोर्चा अध्यक्षा विजया राहटकर यांचे उद्या गुरूवार दि. 25 जूलै रोजी सकाळी 7 वाजता महाराष्ट्र एक्सप्रेसने येथे आगमन होत असून सकाळी 9 वाजेपर्यंत रेस्ट हाऊस येथुन कार्यकर्त्यांशी हितगूज करणार आहेत.
त्यानंतर तहसील कार्यालयाजवळ व संजय गांधी नगर येथे भाजपा सदस्यता नोंदणी अभियानांची त्याच्या हस्ते सूरूवात होणार आहे. व त्यानंतर राजपुत मंगल कार्यालय, लक्ष्मी नगर येथे प्रज्वला योजना एक जिल्हा एक क्लस्टर, तसेच केंद्र व राज्य शासनाच्या महिलांसाठी विवीध योजना व कायदे या विषयांवर महिला बचत गट प्रशिक्षण कार्यक्रमास मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील, खासदार उन्मेष पाटील, जिल्हा सरचिटणीस तथा सभासद नोंदणी संयोजक पोपटतात्या भोळे, तालूकाध्यक्ष के.बी.साळुंखे, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, महिला आयोगाच्या सदस्या तथा जळगाव ग्रामीण महिला मोर्चा प्रभारी देवयानीताई ठाकरे, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, सभापती स्मितल बोरसे, उपसभापती संजू पाटील, गटनेते संजू पाटील, तालुका संघटन सरचिटणीस प्रा.सूनील निकम, सरचिटणीस अनिल नागरे, धनंजय मांडोळे,Adv. प्रशांत पालवे, अमोल नानकर, तालुका सभासद नोंदणीप्रमुख दिनेश बोरसे, सहनोंदणी प्रमूख डॉ. महेंद्रसिंग राठोड, प्रा.सचिन दायमा, कार्यालयमंत्री अरूण पाटील उपस्थित राहणार असून सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते बंधु भगीनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.